गायत्री स्कूल विद्यार्थ्यांची तायक्वोंदो स्पर्धेत यशस्वी कामगिरी
सत्यविचार न्युज :
तायक्वोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित ३२ वी महाराष्ट्र सब ज्युनिअर क्योरुगी व ९वी पुमसे तायक्वोंदो स्पर्धा नाशिक येथे नुकतीच पार पडली. स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली येथील वेद नितीन रासकर या विद्यार्थ्याने आपल्यातील कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत रौप्य पदकावर नाव कोरले.
या निमित्त संस्थेचे संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वोंदो स्पर्धेत स्वराज गायकवाड व साई चव्हाण यांनी कांस्यपदक पटकावले. जिल्हास्तरावर उत्कृष्ट खेळी करत वेद रासकर याने पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका कविता कडू पाटील व विश्वस्त सरिता विखे पाटील यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्या, उपप्राचार्य तसेच क्रीडा शिक्षक प्रफुल्ल शिंदे यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.