Weather Update : राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता, हवामान बदलाचा परिणाम, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन
सत्यविचार न्युज :
Weather Update : राज्यातील काही भागांमधूनथंडीचं प्रमाण कमी झाले आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज शनिवार आणि उद्या रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आले.
राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच शनिवार, रविवारी पावसाची शक्यता आहे.
विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा,बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणिगडचिरोलीत शनिवारी आणि रविवारी पावसाच्याहजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुबंईसह कोकणात मात्र आकाश निरभ्र राहील, याठिकाणी थंडी आहे तशीच जाणवेल. Weather पावसाची शक्यता मात्र तिथे जाणवत नाही. हवामान खात्याने अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे.