श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनी सप्तशृंगगड येथे श्रींना बोर न्हान
आळंदी : अयोध्येतील नूतन श्रीराम मंदिरात आज सोमवारी ( दि. २२ ) प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमंत यांच्या स्थापित झालेल्या मूर्ती यांचे आयुर्मान हे ५ वर्ष निर्धारित केलेले असून हिंदू संस्कृती मधील प्रथा परंपरा विचारात घेता अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्या नंतर श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्रीराम मंदिरातील श्रींचे मूर्तीला सुवासिनीं व पुरोहितांच्या हस्ते विधिवत पद्धतीने “बोर न्हान घालण्यात आले. विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी मंदिरात झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हे मातृपीठ आहे. वनवासात दंडकारण्य प्रवासात श्रीरामांनी श्री भगवतीचे दर्शन घेतल्याचे विविध अध्यात्मिक पुरावे आहेत. पर्यायी या वैश्विक श्रीराम मंदिर स्थापना कालावधीत विश्वस्त संस्थेने श्रीराम यागचे आयोजन केले. दरम्यान भोळी श्रद्धा व भावेनेपोटी हा विधी करून श्रीरामा प्रती ही सेवा अर्पण करण्यात आल्याचे देवस्थानचे विश्वस्त व मंदिर व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले. दरम्यान अयोध्या मंदिराच्या प्रथम स्थापनेचा दिवस म्हणून केक देखील कापण्यात आला.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240122-WA0035-1-1024x726.jpg)