इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे आळंदीतून प्रस्थान
श्रीक्षेत्र देहु वैकुंठ मंदिरात पालखी सोहळाचा मुक्काम
पायी परिक्रमा हरिनाम गजरात मार्गस्थ
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीस परिक्रमेत समाज प्रबोधन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदी दक्षिण तटावरून उगमस्थान श्रीक्षेत्र कुरवंडे ते श्रीक्षेत्र तुळापूर ते आळंदी या मार्गावरून हरिनाम गजरात जाण्यास इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा प्रथमच हरिनाम गजरात रविवारी ( दि. १७ ) मार्गस्थ झाला. सोहळा देहू मुक्कामी हरिनाम गजरात विसावला. सोमवारी ( दि. १८ ) देहू येथून सकाळी साडे सहा वाजता वडगाव मावळ मुक्कामी सोहळा विसावणार आहे.
आळंदी येथून सोहळ्यास प्रारंभ होण्यापूर्वी माऊली मंदिरात वेदमूर्ती प्रल्हाद प्रसादे यांचे हस्ते इंद्रायणी जल कलश श्रींचे समाधीस स्पर्शित करून इंद्रायणी परिक्रमा पालखी सोहळ्यात मार्गस्थ करण्यास नदी घाटावर आणण्यात आला. यावेळी माऊली मंदिरात विचारसागर महाराज लाहुडकर, अर्जुन मेदनकर, गोविंद तौर आदी उपस्थित होते. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती, जलपूजन करून बाळासाहेब घुंडरे पाटील यांनि सपत्नीक कलश पालखी रथात हरिनाम गजरात ठेवला. प्रस्थान सोहळ्यास माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आनंदराव मुंगसे, मालनताई घुंडरे पाटील, अरुण घुंडरे, भोलापुरीजी महाराज, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर उर्फ बापू कुऱ्हाडे, ह.भ.प. भगवान महाराज पवार, निवृत्ती महाराज कदम, ह.भ.प. विचारसागर महाराज लाहुडकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे सुधाकर मोरे, संदीप गोदेगांवे, देविदास टिळे, बाळासाहेब जामदार, ज्ञानेश्वर लोखंडे, सुरज कुरडे यांचेसह वारकरी भाविक उपस्थि होते.
आळंदीहून हरिनाम गजरात सोहळा मोशी मार्गे टाळगाव चिखली येथे दुपारचा विसावा घेण्यास विसावला. येथे संत तुकाराम महाराज मंदिर टाळगाव चिखली ग्रामस्थ यांनी स्वागत, सत्कार सोहळ्याचा पाहुणचार केला. येथे परमेश्वर महाराज गव्हाणे यांनी इंद्रायणी परिक्रमेचा उद्देश, नदी प्रदूषण मुक्त व्हाव्यात यासाठी आपले प्रवचनातून आवाहन करीत संत तुकाराम महाराज यांचे अभंगावर प्रवचन सेवा दिली. येथे टाळगाव चिखली ग्रामस्थानी परिश्रम पूर्वक नियोजन करीत सोहळ्यास अन्नदान सेवा रुजू केली. त्यानंतर सोहळा हरिनाम गजरात श्रीक्षेत्र देहू येथे रात्रीचे मुक्कामास भक्त निवासात विसावला. भाविक पायी दिंडी परिक्रमा हरीनाम गजरात करीत असून या उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीस इंद्रायणी नदीचे दुतर्फा मुक्कामाचे ठिकाणी कीर्तन सेवेचे माध्यमातून समाज प्रबोधन केले जात आहे. या पालखी सोहळ्याचे आयोजन १७ ते २८ डिसेम्बर २०२३ या कालावधी होत असल्याचे ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर यांनी सांगितले.देहुगांवात वैकुंठ गमन मंदिरात देहु गावातील संतोष बोराटे यांनी अन्न दान केले. यावेळी इंद्रायणी आरती झाली. रात्री हरि किर्तन उत्साहात करण्यात आले. सोहळा पुढील प्रवासास सोमवारी ( दि १८ ) चिंचोली, तळेगांव दाभाडे मार्गे वडगाव मावळ येथे दुसर्या मुक्कामास विसावेल. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व नदीचे पावित्र्य जतन करणे गरजेचे आहे. यासाठी इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे व्यवस्थापक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.