निघोजे येथे शनिवारी रक्तदान, नेत्र तपासणी व मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,.
चाकण : प्रतिनिधी
सत्यविचार न्युज
अपघात ग्रस्तांचे प्राण वाचण्यासाठी उद्योजक स्व. संतोषभाऊ सोपान शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून निघोजे ( ता. खेड ) येथे शनिवारी ( दि. २३ ) भव्य रक्तदान शिबिर, मोफत महाआरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आदर्श सरपंच पुरस्कार विजेत्या कांचनताई शिंदे यांनी दिली.
खेड तालुक्यातील निघोजे येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेदांत हॉस्पिटल, मंत्रा रेसिडेन्सी निघोजे येथे डॉ. गोपाळ बाजड आणि डॉ. अश्विनी बाजड हे शिबिराथींची मोफत तपासणी करून मार्गदर्शनपर सल्ला देणार आहेत. त्यानंतर अकरा वाजता श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था देवाची आळंदी व निघोजे येथील भैरवनाथ महिला भजनी मंडळ यांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त बारा ते सायंकाळी सहा या वेळात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन शिंदे परिवाराच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शीलाताई शिंदे, माजी सरपंच कांचनताई शिंदे, उद्योजक दीपक शिंदे, ओम शिंदे, कुणाल शिंदे, कोमल मोरे, धनंजय मोरे, आदित्य शिंदे आदींनी केले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रवण सुखाबरोबर अन्नदानाचा लाभ घ्यावा असे आव्हान स्व. संतोषभाऊ शिंदे युवा मंच खेड तालुका व ओम शिंदे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.