अलंकापुरीत वारकरी भाविक परतीचे मार्गावर
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील कार्तिकी यात्रा अंतर्गत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा हरिनाम गजरात झाल्यानंतर भाविक, वारकरी यांनी आपापल्या दिंड्यासह, मिळेल त्या वाहनाने हरिनाम गजरात परतीचा प्रवास सुरू केला. आळंदीत गेल्या आठ दिवसांत लाखो भाविकांची गर्दी ओसरली असून आळंदी आता सूनी सुनी दिसू लागली आहे कार्तिकी यात्रेसाठी राज्य परिसरातून आलेले वारकरी यांनी हरिनाम गजरात भाविकांनी परतीचे प्रवास सुरुवात केली.
यामुळे सार्वजनिक बस स्थानक, खाजगी वाहने तसेच दिंड्यांची वाहने आळंदी बाहेर जाताना लगबग होती.
कार्तिकी यात्रेत आलेल्या भाविकांनी प्रसाद आदी साहित्य खरेदी करीत परतीचा मार्ग धरला. आळंदी नगरपरिषद प्रशासन आरोग्य विभागाने स्वच्छता उपक्रम हाती घेतला असून येत्या दोन दिवसात संपूर्ण आळंदी चकाचक करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे मार्गदर्शनात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदु वणवे, डॉ. शुभांगी नरवाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे,कविता भालचीम यांचे माध्यमातून परिश्रम पूर्वक सुमारे ३० हजारावर भाविकांना आरोग्य सेवा उपचार आणि औषध वाटप केले आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .यात्रा नियोजन मध्ये भाविकांची संख्या कमी झाल्याने पोलिस बंदोबस्त देखील कमी करण्यात आला आहे. रात्री उशिरा श्रींचे पालखी छबिणा मिरवणुकीने कार्तिकी यात्रेची हरिनाम गजरात सांगता होत आहे.पिण्याचे पाणी वाटावं व माऊली मंदिरात प्रसाद वाटप सेवा पिंपरी चिंचवड शहर आर्ट ऑफ लिविंगचे वतीने साधक सेवकांनी उत्साहात केली.