खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेल अध्यक्षपदी ॲड अरुण मुळूक यांची निवड
राजगुरुनगर येथील राजगुरुनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड अरुण गोकुळ मुळूक यांची राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल (अजित दादा गट) खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आमदार दिलीपराव मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड शुभम खोमणे यांनी ॲड अरुण मुळूक यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायकशेठ घुमटकर, नवनाथशेठ होले, माजी वन अधिकारी प्रभाकर कड पाटील ,खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड नवनाथ गावडे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस ॲड अनिल राक्षे, ॲड अतुल गोरडे, ॲड मनीषाताई टाकळकर, ॲड माणिक वायाळ, प्राध्यापक पांडुरंग मुळूक, चास विकास सोसायटीचे संचालक गणपतराव मुळूक, आखरवाडीचे माजी उपसरपंच विठ्ठलराव मुळूक, ग्रामपंचायत सदस्या नीलमताई मुळूक, सुरेश मुळक, युवा कार्यकर्ते समीर मुळूक, वैभवशेठ नाईकरे नामदेव तनपुरे, निखिल मुळूक, ॲड अजय पडवळ ॲड महेश कोहिंकर, गौरव मुळक,अजय मुळक ,प्रथमेश बुट्टे, इत्यादींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या अगोदर मागील अनेक वर्षांपासून ॲड अरुण मुळूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्य करत आले आहे. त्यांनी राजगुरुनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष पद, अध्यक्ष पद, राजगुरुनगर लीगल सेलचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष पद अशी पदे भूषवले आहेत. सदर पदांवर काम करत असताना त्यांनी आरोग्य शिबिरे, शालेय स्पर्धा, वृक्षारोपण, अनाथश्रमांना मदत, कोरोना काळात लसीकरण कॅम्प व कोरोना सुरक्षा आरोग्य किट वाटप,कायदेविषयक शिबिरे व अशी इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष पद भूषवत असताना त्यांनी अनेक वकिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच गावचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ यांच्या बरोबरीने खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या माध्यमातून आमदार फंडातून व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या फंडातून निधी मंजूर करून गावची विकास कामे साधन्यासाठी प्रयत्न केले आहे. आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर शहर, चाकण शहर, आळंदी शहर, पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट यांच्यामध्ये राष्ट्रवादी लीगल सेलचे पदाधिकारी यांची नेमणूक करून संपूर्ण खेड तालुक्यांमध्ये तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.