परम पूज्य उपप्रवर्तींनी सुमनप्रभाजी महाराज साहब यांच्या वाढदिवशी राजगुरूनगर जैन स्थानक मध्ये आनंदयात्रा…
काल राजगुरूनगर जैन स्थानक मध्ये परम पूज्य उपप्रवर्तींनी सुमनप्रभाजी महाराज यांचा वाढदिवस मन्हजेच अवतरनदिन साजरा केला गेला.आदरणीय गुरुणी सुमनप्रभाजी यांनी काल अत्यन्त सुंदर अशा पद्धतीने नागरिकांना प्रवचन देत त्याचा आनंद साजरा करण्याची संधी सुद्धा दिली.काल महाराज साहब यांनी आपल्या आध्यत्मिक आयुष्याची 62 वर्ष्य पूर्ण करून 63 व्या वर्षत पदार्पण केले.दररोज प्रमाणे आज सुद्धा सकाळी 6 वाजता जपनामाने सुरुवात करून कार्यक्रमास सुरुवात झाली.तदनंतर प्रवचन झाले व ह्या कार्यक्रमा चा आनंद 12 वाजेपर्यंत नागरिकांना घेता आला.ह्या दरम्यान नागरिकन साठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमचे आयोजन 1 महिना भरापूर्वी राजगुरूनगर जैन संघा तर्फे करण्यात आले होते.तसेच हा अवतरण दिन तब्ब्ल एक आठवडा निरनिराळ्या कार्यक्रमानी साजरा करण्यात आला होता …यामध्ये जैन संघाच्या महिला प्रतिनिधिनीचा सहभाग लक्षनीय होता.ह्या कार्यक्रमांस संपूर्ण महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जैन बांधव उपस्थित होते