आळंदी कार्तिकी वारीत वारकऱ्याच्या स्नानास वडिवळे धरणातून पाणी सोडणार :- आमदार दिलीप मोहिते पाटील
आळंदी : येथील आळंदी कार्तिकी यंत्रे अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास राज्यासह परिसरातून लाखो भाविक आळंदीत श्रींचे देवदर्शन आणि इंद्रायणी नदीत स्थान माहात्म्य जोपासत स्नान करीत नदीचे पाणी तीर्थ म्हंणून प्राशन केले जाते. मात्र सद्या मोठ्या प्रमाणात नद्यांचे प्रदूषण वाढल्याने इंद्रायणी नदीत भाविकांच्या स्नानाची गैरसोय टाळण्यासाठी वरील वडिवळे धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल असे खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी आळंदी समस्यांवर संवाद साधताना पत्रकारांना सांगितले.
आळंदी येथील हॉटेल आराधना गार्डन येथे आळंदीतील विविध समस्यां बाबत चर्चा करण्यास खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे समवेत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक पांडुरंग गावडे, प्रहार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्षा अर्चना घुंडरे, समन्वयक अर्जुन मेदनकर आदी उपस्थित होते.
आमदार मोहिते यांनी आळंदीत पत्रकारांशी खेड आळंदी विधान सभेसह येथील विविध नागरी समस्यांवर संवाद साधला. यावेळी विविध समस्यां जाणून घेत उपाय योजना करण्यास पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. येथील प्रदूषित इंद्रायणी नदी वर देखील त्यांनी आपली भूमिका मांडत आता आळंदीसह खेड मधील भीमा भामा नद्यांचे ही परिसरात लोक वस्ती वाढल्याने नदी प्रदूषण वाढले आहे. यावर उपाय योजनेस प्रभावी पणे बारीक सारीक गोष्टींचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा कोणी किती काहीही केले तरी नद्यांचे प्रदूषण रोखणे अवघड होईल. सद्या सर्वत्र नद्यात थेट सांडपाणी सोडले जाते. हे बंद होण्यासाठी नद्यांचे दुतर्फा गावांसह महापालिकेच्या हद्दीत ठिकठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापर करण्यास देण्याची गरज आहे. नदीत थेट सांडपाणी जाणार नाही याची दक्षता प्रथम घ्यावी लागेल असेही त्यांनी सांगितले. नद्यांचे दुतर्फ़ा रेड व ब्लू लाईनचा सद्या अनेकांना विसर पडला आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढली असून प्रशासनांकडून केवळ नोटिसा देण्या पलीकडे काही करत नाही. मनुष्यबळाचा अभाव असल्याने कारवाईचा बडगा उचलण्यास प्रशासन सक्षम नाही. पीएमआरडीए स्थापन झाले. मात्र निधी आणि प्लॅनिंग तसेच कर्मचारी, अधिकारी न दिल्याने कामकाजावर मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणेस पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याने विकास कसा साधणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आळंदीत मोठ्या प्रमाणात करांची थकबाकी असल्याने निधी नाही. पदाधिकारी नाही. प्रशासक कामकाज असल्याने काम करण्यास अडचणी असल्याचे सांगत आपले कडे काही प्रस्ताव आल्यास निधी साठी पाठपुरावा करून विकास कामे प्राधान्याने मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली. येथील बाह्यवळण मार्ग, घनकचरा समस्यां, दिवसाआड पिण्याचे पाणी, पाणी साठवण क्षमता यावर चर्चा करण्यात आली. आळंदी चाकण मार्गावरील अरुंद पुलांची ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि पुलांची नव्याने उभारणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंद्रायणी नदी वरील डुडुळगाव ते आसाराम महाराज आश्रम केळगाव जोडणारा पूल तयार असून महापालिकेच्या हद्दीतील अपूर्ण रस्ता देखील लवकरच वापरास मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी, भीमा, भामा या नद्यांचे प्रदूषण देखी वाढले आहे. अनेक ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारावे लागतील असे आमदार मोहिते यांनी सांगितले. चाकण, आळंदी खेड मध्ये लोकवस्ती वाढली मात्र त्या प्रमाणात नागरी सुविधा देण्यासाठी दूरदृष्टी कोनातून विचार करून शासनाने निधी सह उपाय योजना करणे गरजेचे आहे. आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ साठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.