राजगुरूनगर :
योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज यांच्या आदेशानुसार पतंजली योग समितीचे हरिव्दार येथील केंद्रीय युवा प्रभारी ॠतदेव स्वामी यांनी योग प्रचारासाठी खेड तालुक्याचा दौरा केला. येथील राजगुरूवाड्यात जाऊन हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांना अभिवादन केले.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र युवा प्रांत प्रभारी अतुल आर्य, योग प्रचारक नितीन मांढरे, सोशल मीडिया पुणे जिल्हा प्रभारी जनार्दन पांडेय, जिल्हा कृषी प्रभारी धर्मा नवले, खेड तालुका प्रभारी महादेव नेहरे, भारत स्वाभिमान प्रभारी यशवंत बोंबले, कृषी सहप्रभारी बाळासाहेब गाडे, युवा सहप्रभारी राम बोंबले, प्रा. दत्तात्रय पाचारणे, डॉ. महादेव घुले, प्रभाकर माळी, गोविंद बुट्टे, रामदास तांबे, डॉ. माणिक बिचकर, शहर प्रखंडप्रमुख अमितकुमार टाकळकर यांच्यासह सतीश चांभारे, धनंजय कुंभार, गोविंद तांबे आदी योगसाधक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी ॠतदेव स्वामी यांनी योगविज्ञान, विषमुक्त शेती, आरोग्य आणि आयुर्वेद चिकित्सा आणि प्रखंडनिहाय योगप्रचार विस्तार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. राजगुरूनगर येथे दि. १० डिसेंबर पासून सहयोगशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच योग विस्तारासाठी ३५ वयोगटातील युवकांना तीस हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांनी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी यावेळी केले.