खेड तालुक्यात एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. नितीन लक्ष्मण कांबळे (वय 23 रा. खराडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अमोल माटे यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेकायदेशीर रित्या एक गावठी बनवटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन उभा होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडील शस्त्र जप्त केले आहेत व आरोपीवर बेकायदेशीर रित्या शस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.