चाकण लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोंबर सेवा सप्ताह साजरा,
चाकण : प्रतिनिधी
चाकण लायन्स क्लबच्या वतीने लोकोपयोगी उपक्रम राबवून ऑक्टोबर सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वछता मोहीम, रक्तदान शिबिर आदि उपक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जागतिक शांतता या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्नेहांगण वृद्धाश्रम येथील वृद्धांना नवीन कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. पी. के. स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन्स कडाचीवाडी येथील दिव्यांग मुलांसाठी खेळणी व खाऊ वाटप तसेच स्नेहांगण आश्रम कोयाळी येथे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश कानडे व सचिव आशुतोष कानडे यांनी दिली. यावेळी किरण मेदनकर, शीतल गावडे, अपर्णा कानडे, एकनाथ येवले, डॉ. वर्षा परदेशी, लक्ष्मण नाणेकर, शंकर डोंगरे, वंदना मिर्गे, मनीषा पवार, तुकाराम कुटे आदि उपस्थित होते. या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
———————————