चाकण येथे कर्तृत्ववान नागरिकांचा कृतज्ञता सन्मान पुरस्काराने गौरव
भरतशेठ कानपिळे यांचा विशेष सन्मान
चाकण : प्रतिनिधी
स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चाकण येथे कर्तुत्वान नागरिकांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. येथील उद्योजक भरतशेठ कानपिळे हे उद्योगरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले.
सक्सेस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा व चाकण येथील प्रसिद्ध उद्योजक भरत एकनाथ कानपिळे व उद्योजक बाळासाहेब मांजरे यांना मानाचा उद्योगरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. आरोग्यदूत पुरस्कार सुनील शहा, रवी सुरेश लोहिरे यांना देण्यात आला. तसेच शिक्षणरत्न पुरस्कार संजय नाईकडे यांना, तर सेवाभावी संस्था पुरस्कार माऊली सेवा प्रतिष्ठान खेडचे कैलास दुधाळे यांना प्रदान करण्यात आला. क्रीडाभूषण पुरस्कार मॉर्डन हायस्कूल भोसे, वनश्री पुरस्कार सपना हिराचंद राठोड यांना तर सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार कमल कळमकर यांना देण्यात आला. समाजसेवा पुरस्कार सत्यवान लक्ष्मण नवले, कलारत्न पुरस्कार निकिता व अवंतिका शंकर बहिरट, विशेष प्रोत्साहनपर माहिती सेवा पुरस्कार दत्तात्रय विठ्ठल साबळे व अर्जुन मेदनकर यांना देण्यात आला. कामगार नेते अविनाश वाडेकर यांना कामगार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विलास लांडे, राम कांडगे, योगेश टिळेकर, शांताराम घुमटकर, अतुल देशमुख, अमोल पवार, दिपक ताटे, विजय शिंदे, क्रांती सोमवंशी, विजया शिंदे, नितीन गोरे, शिवाजीराव आढळराव पाटील, मनीषा गोरे, अनुराग जैद, सयाजी मोहिते, सोमनाथ मुंगसे, शरद बुट्टे पाटील, शिवाजी वरपे, भगवान पोखरकर, मुक्ताजी नाणेकर, महेश शेवकरी आदी उपस्थित होते.
हभप. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांची कीर्तनरुपी सेवा पार पडली. उपस्थित नागरिकांनी यावेळी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. नितीन गोरे, विकास गोरे, मनीषा गोरे, दत्तात्रय गोरे, ओंकार गोरे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.