चक्रेश्वर पतसंस्थेच्या वतीने दहा टक्के लाभांश जाहीर.
चाकण : प्रतिनिधी
सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू असलेल्या चाकण येथील चक्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. चक्रेश्वर पतसंस्थेच्या वतीने दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक ज्ञानेश्वर केळकर यांनी दिली.
चक्रेश्वर पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या माजी अध्यक्षा लता घुमटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्षा सविता शेवकरी, संचालक संदीप कानपिळे, हेमंत बिरदवडे, योगेश लेंडघर, अनिल गोसावी, प्रमोद साळुंखे, सुरेश बिरदवडे, सर्जेराव गोरे, रामदास बिरदवडे, तसेच खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे, उद्योजक चंद्रकांत गोरे, चाकण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या नीता केळकर, माजी सदस्य पांडुरंग गोरे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ बिरदवडे, संस्थेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी धाडगे, कैलास लेंडघर, शिवाजी बिरदवडे, मधुकर घुमटकर, नंदा लेंडघर, शोभा गोरे, राजेंद्र घुमटकर, अक्षय केळकर आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ, महिला, संस्थेचे सभासद खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियमित कर्ज भरणाऱ्या सभासद व एजंट कर्मचाऱ्यांचा यावेळी ज्ञानेश्वर केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेच्या सचिव जाहिरा मुंडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे भाग भांडवल व कार्यक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन केळकर यांनी यावेळी दिले. पोटनियम दुरुस्तीसाठी चा प्रस्ताव मान्य करून घेण्यात आला. संस्थेच्या कामकाजाचा आलेख उंचावत राहत असल्याने त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. चंद्रकांत गोरे, पांडुरंग गोरे, बाळासाहेब लेंडघर आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
योगेश लेंडघर यांनी स्वागत केले. हेमंत बिरदवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियंका केळकर – जाधव यांनी आभार मानले.