ॲडविक हायटेक लिमिटेड कंपनीद्वारे शिरोली शाळेत बांधलेल्या वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
सत्यविचार न्यूज :
ॲडविक हायटेक प्रा. लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर निधीतून खेड तालुक्यातील शिरोली जिल्हा परिषद शाळेस ४ वर्गखोल्या बांधून देण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच कंपनीचे चेअरमन राधेश्याम भरतिया व राऊंड टेबल इंडियाचे चेअरमन गुरप्रितसिंह छाब्रा यांच्या हस्ते पार पडला.
शिरोली शाळेतील मुलांचा पट वाढल्याने वर्गखोल्या कमी पडत होत्या. त्यामुळे कंपनीचे एचआर मॅनेजर नितीन सावंत यांच्या माध्यमातून या वर्गखोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या.
यावेळी चेअरमन भरतिया यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, भविष्यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ॲडविक परिवार नेहमी प्रयत्नशील राहिल. शिक्षण हे विकासाचे मूळ आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेतले तर तेच उद्या आपला देश घडविणार आहेत. त्यांची प्रगती हीच आपल्या समाजाची देशाची प्रगती ठरेल.
याप्रसंगी सरपंच कु. मुदीता देखणे, उपसरपंच सारिका कडाळे, माजी सरपंच चंद्रकांत सावंत, माजी सरपंच रविंद्र सावंत, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण सावंत, उपाध्यक्षा सुवर्णा वाडेकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तोबा सावंत, उपाध्यक्ष संजय देखणे, कुलस्वामिनी अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल राक्षे, संचालक भानुदास सावंत, माजी उपसरपंच गोरक्षनाथ सांडभोर, माजी उपसरपंच संजय सावंत, माजी उपसरपंच संतोष खरपासे, माजी उपसरपंच जया दजगुडे, माजी उपसरपंच हिरा वाळुंज, ग्रामपंचायत सदस्या अरुणा पवळे व उज्ज्वला शिंदे, माजी चेअरमन माऊली आप्पा खरपासे, जगन सावंत व तुकाराम सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदूशेठ वाडेकर, देवस्थानचे विश्वस्त सीताराम बेंढाले व लहू सावंत, नवनाथ पारघे, कुंडलिक पवळे, धर्मेंद्र पवळे, सुनिल सावंत, सुरेश शिंदे, गोटीराम वाडेकर, संदीप पवळे, उद्योजक दत्ता वाळूंज व संदीप दजगुडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दाजीभाऊ सावंत, उपाध्यक्ष सत्यवान शिंदे व्यवस्थापन समितीचे सदस्य महेश खरपासे, सदस्या शितल बेंढाले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजेश कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन गोडे सर यांनी केले. आभार कु. अर्नव पवळे याने व्यक्त केले.