हुतात्मा राजगुरू समाजभुषण गौरव पुरस्कार अनंत तायडे यांना प्रदान
सत्यविचार न्यूज :
हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त वेताळे तालुका खेड येथील 14 ट्री संस्थेचे व्यवस्थापक अनंत तायडे यांना “हुतात्मा राजगुरू समाज गौरव पुरस्कार 2024 ” प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक ‘शिवनेरी भूषण’ रमेश खरमाळे हे उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज विधायक कामे केले जातात तसेच प्रतिवर्षी वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा राजगुरू यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
खेड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात 14 ट्री या संस्थेच्या मार्फत पर्यावरण रक्षणाचे काम केले जाते. आज पर्यंत लाखो झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन या संस्थेच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच आदिवासी समाजातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार श्री अनंत तायडे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गरजु लोकांना नविन कपडे वाटप आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शिरोली गावचे उद्योजक स्वराज्य टेलर्स चे काळुराम दसगुडे यांनी गरजू लोकांना देण्यासाठी 200 नवीन ड्रेस फौंडेशन कडे जमा केले होते.
यावेळी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष दिलीपशेठ होले उपाध्यक्षा संगीताताई तनपुरे कार्याध्यक्ष डॉ. निलम गायकवाड तसेच सचिव अमर टाटीया व संचालक अॅड. सचिन वाळुंज, अॅड.मनीषा पवळे ,डॉ. वंदना शेवाळे , राजन जांभळे अॅड.सुनील वाळुंज, शिल्पाताई बुरसे नाजनिन शेख, राहुल वाळुंज, राहुल मलघे संचालक उपस्थित होते. तसेच आदर्श शिक्षक संदिप जाधव सर ग्रामपंचायत सदस्य बाबाजी वाळुंज, वेताळे गावचे पोलीस पाटील श्री सयाजी शिंदे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य देविदास बोंबले,तंटामुक्ती अध्यक्ष संदिप बोंबले. यांच्यासह वेताळे गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मधुकर गिलबिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश बोंबले आभार बाळासाहेब सांडभोर यांनी मानले.