राजगुरूनगर :
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा शेगाव (जि. बुलढाणा) येथील देशमुख मंगल कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली, अशी माहिती चाकण नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, मुख्याधिकारी जयश्री काटकर, आशिष बोबडे, सतीश पुदाके, विजयकुमार आश्रमा उपस्थित होते. यावेळी राज्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कार्यरत संवर्ग अधिकारी चांगल्या पद्धतीने कामकाज करतासून त्यांचे सर्व प्रश्न व मागण्या ह्या कायदेशीर व न्याय्य असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतील असे आश्वासन आमदार कुटे व आमदार फुंडकर यांनी दिले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात संवर्ग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.