मुलांनो ध्येयाकडे वाटचाल करा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे राज्य समन्वयक राजेश आंधळे यांचे प्रतिपादन
सत्यविचार न्यूज :
भोसे (ता.खेड) मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे प्रशालेची पहिली शिक्षक-पालक सर्वसाधारण सभा शांताई मंगल कार्यालय येथे पार पडली या सभेमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती प्रशालेच्या प्राचार्य सीमा कुळधरण यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रशालेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी , एनएमएमएस् शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व खेळाडू यांचा गुणगौरव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे राज्य समन्वयक राजेश आंधळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण , विविध अंगी विद्यार्थी या बहुमूल्य विषयांवर मार्गदर्शन केले .आयुष्यात जर आपल्याला उच्च ध्येय गाठाययचे असेल तर त्याकडे प्रामाणिकपणाने वाटचाल करा.यश नक्कीच संपादन होईल असा बहुमूल्य सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह सुरेश तोडकर यांनी करिअर म्हणजे काय ? या विषयावर मार्गदर्शन केले .
यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह दिपक मराठे , भोसे शाळा समितीचे व्हिजिटर उद्धव खरे , सदस्य राजीव कुटे , भोसे ग्रामपंचायत सरपंच विजय काळे , उपसरपंच लंकाबाई कुटे , कनिष्ठ महाविद्यालय समन्वय समिती अध्यक्ष संदिप गांडेकर , शिक्षक – पालक संघ उपाध्यक्ष व सर्व सदस्य , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक , विद्यार्थी उपस्थित होते .
या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे , कार्यवाह शामकांत देशमुख , सहकार्यवाह ज्योत्सना एकबोटे यांनी कौतूक केले.