महाळुंगे (खेड)-
पुणे सहोदया यांनी आयोजित केलेल्या G20 उपक्रमांपैकी नुक्कड नाटक या उपक्रमात ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सी. बी. एस.ई. विभाग स्तरीय समिट २०२३ मध्ये “हेल्थ अँड वेल बिईंग ऑफ स्कुल गोईंग चिल्ड्रन” या थीम अंतर्गत भारतीय तरुण पिढिला व्यसनमुक्त होऊन भारताचे भविष्य उज्वल करण्याचे संदेश देत नुक्कड नाटकाचे सादरीकरण केले.
या नुक्कड नाटकामध्ये इयत्ता दहावीचे १२ विद्यार्थी – आयुष धाडगे, समर्थ झिंजुरके, यश लेंडघर, श्रेयश पिंजण, सिद्धी खराबी, सिद्धी कड, श्रावणी कड, श्रावणी येळवंडे, गौरी मंडल, अनुष्का भांगरे, तेजस्विनी बोरकर आणि दिव्या काळे इ. सहभागी झाले. सदर विद्यार्थ्यांची सी.बी.एस.ई. राज्यस्तरीय किशोर समिट पुणे २०२३ साठी निवड करण्यात आली. यासाठी शाळेतील शिक्षिका अश्विनी कागले ,चरण खताळ व रामेश्वर पवार यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका वंदना रोकडे यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक अविनाश शिवळे पाटील, सेक्रेटरी योगेश रोकडे व डायरेक्टर रोहिदास रोकडे यांनी विदयार्थ्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून विद्यार्थी व शिक्षकांना राज्यस्तरीय किशोर समिट पुणे २०२३ मध्ये नुक्कड नाटक सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.