तालुक्याच्या गावागावात जाणार योजना दूत मोबाईल व्हॅन
मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम
शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुधीर मुंगसे यांचा पुढाकार
सत्यविचार न्यूज :
राजगुरुनगर : मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनच्या वतीनं खेड तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी ‘योजना दूत’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
मी सेवेकरी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्यावतीनं खेड तालुक्यातील प्रत्येक गावात शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी ‘योजना दूत मोबाईल व्हॅन’ सुरु करण्यात आली आहे. या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
‘मी सेवेकरी, आपल्या दारी’ असे घोषवाक्य घेऊन ही व्हॅन योजना पोहोचवण्यासाठी गावोगावी जाणार आहे. या व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्यास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल झरेकर, राजगुरूनगर बँकेच्या संचालिका विजया शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षा मनीषा सांडभोर, सेनेचे तालुका समन्वयक अमोल पवार, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, सेनेचे खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्यासह खेड तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या योजना दूत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लाकडी बहीण योजना, पीक विमा योजना, महा DBT, आयुष्यमान भारत, संजय गांधी विधवा महिला पेंशन योजना, नवीन मतदार नोंदणी यासह विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जाणार आहे. या व्हॅनमध्ये योजनांचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
दररोज दोन गावांमध्ये ही व्हॅन जाणार असून जास्तीतजास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी केले आहे.