विठ्ठल रुख्मिणी शिक्षण प्रसारक
मंडळाच्या संचालकपदी सचिन मांजरे व अक्षय मांजरे.
चाकण : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील मांजरेवाडी – पिंपळ येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विठ्ठल रुख्मिणी शिक्षण प्रसारक मंडळ व कै. वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय या संस्थेच्या संचालकपदी येथील युवा उद्योजक सचिन किरण मांजरे व अक्षय आनंदा मांजरे या दोघांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मांजरे यांनी दिली.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000575925.jpg)
संस्थेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत सचिन मांजरे व अक्षय मांजरे यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव मुरलीधर मांजरे, ज्येष्ठ संचालक काळूराम मांजरे, मनोज मांजरे, साळूबाई मांजरे, पार्वतीबाई मांजरे, तुषार मांजरे, विलास मांजरे, महेंद्र मांजरे आदि उपस्थित होते. किरणशेठ मांजरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने यावेळी विद्यालयाला ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. नवनिर्वाचित संचालक सचिन मांजरे व अक्षय मांजरे यांचा यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/IMG-20240718-WA0005.jpg)