आषाढीनिमित्त महाळुंगे येथील समर्थ ज्योती मध्ये बाल वारकऱ्यांनी अनुभवली पंढरीची वारी
सत्यविचार न्युज :
आषाढी एकादशीनिमित्त महाळुंगे येथील समर्थ ज्योतीच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या दिंडीने परिसर विठ्ठलमय झाला. टाळ, मृदुंग, ढोल, ताशांचा गजर व विठुरायाच्या नामघोषात बाल वारकरी तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, भक्तिगीते, हरिपाठ, अभंग सादर केले. तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पाऊले चालती.. पंढरीची वाट’, असे म्हणत विद्यार्थ्यांनी दिंडीचा अनुभव घेतला.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000575101-576x1024.jpg)
यावेळी विद्यार्थ्यांनी कीर्तन, भारुड, अभंग, संतांच्या जीवनातील प्रसंग, नाट्यछटा, विठ्ठलाची आरती, नृत्य, विविध संतांची महती गाण्यांद्वारे दाखविली.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000575085-1024x576.jpg)
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केलेल्या होत्या. भारुडातून ‘ पाणी वाचवा ‘ संदेश देण्यात आला. तसेच पर्यावरण वाचवा झाडे लावा पाणी जिरवा, स्वच्छता राखा हा संदेश देण्यात आला.
वारकरी संप्रदायाचा देखावाही तयार करण्यात आला होता.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000575088-1024x576.jpg)
समर्थ ज्योती संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांची कार्यक्रमाची तयारी सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने करून घेतली.