चाकण येथे बेघरांची अबकड प्रपत्र
दाखल करण्यासाठी झुंबड,.
चाकण : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील चांदूस येथे हजारो भूमिहीन, भाडेकरू व बेघरांना राहाण्यासाठी सरकारी एक गुंठा जागा देण्याचे शासनाकडून निश्चित झाले आहे. विभागीय आयुक्तांसह पुण्याचे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिका-यांकडून या सरकारी जागा मोजणीचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनास ” अबकड ” प्रपत्र दाखल करण्यासाठी बेघर नागरिकांची झुंबड उडाली आहे. सबंधित जागा मोजणीसाठी आवश्यक असणारी अतितातडीची फी भापसेच्या माध्यामातून भरली असल्याची माहितीही भापसेचे अध्यक्ष दिपक ताटे यांनी दिली.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000569175.jpg)
चांदूस येथे हजारो बेघरांसाठी राहण्याकरिता सरकारी एक गुंठा जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून मौजे चांदूस येथील सरकारी जमीन गट नं. १४२, ५९१ व ४७४ ही शासकीय जागा मोजणीचे आदेश खेडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिका-यांना दिले आहेत. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम व विभागीय आयुक्त रामचंद्र शिंदे यांनी देखील जिल्हा अधिक्षक कार्यालयास जागा मोजणी करण्यासंदर्भात तातडीची कारवाई करण्यात यावी, असे लेखी व स्पष्ट आदेश दिले आहेत. विहित प्रणालीचा अवलंब करून चांदूस येथील वरील गटाची सरकारी जागा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खेड प्रशासनाकडून तातडीने मोजून मिळणार असल्याने बेघर नागरिकांचे त्याकडे लक्ष लागले आहे. यावेळी शिल्पा शिंदे, अनिता ओव्हाळ, हिरा कदम, अंजली देशमुख, उषा जाधव, अनुसया भालेराव, शालन सोनवणे, शांता पखाले, संजीवनी महापुरे, राजेश पदमने, वसंत पखाले आदींसह हजारो बेघर नागरिकांनी आपले ” अबकड ” प्रपत्र दाखल केले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000569177.jpg)
” जिल्हा महसूल अधिकारी डॉ. सुनील शेळके व निवासी उपजिल्हा अधिकारी ज्योती कदम यांनी खेड प्रशासनास जागा मोजणीचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जागा मोजणीची अतितातडीची फी भरली आहे. जागा मोजून झाल्यानंतर बेघर नागरिकांचे स्वप्न साकार होणार आहे.” – जयश्री ताटे, प्रदेशाध्यक्षा, भापसे पार्टी
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000569173.jpg)