कृषी निविष्ठांकरिता अर्ज करण्याचे कृषी विभागचे आवाहन
सत्यविचार न्यूज :
खरीप हंगामात नॅनो युरिया सोयाबिन, नॅनो डीएपी सोयाबिन, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व मेटाल्डीहाईड सोयाबिन आदी बाबींसाठी निविष्ठा पुरविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३० जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापुस, सोयाबिन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापुस, सोयाबिन च इतर तेलबिया पिकातील मुल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस सोयाबिन आणी तितर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातुन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर १२ जून पासून निविष्ठांच्या बाबीच्या टाईल्स उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निविष्ठांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.