मनशक्तीतर्फे ३५ शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप,
चाकण : प्रतिनिधी
मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने चाकण भागातील ३५ शाळांमधील गरीब, गरजू, अनाथ, आदिवासी आणि गुणवंत अशा ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
चाकण परिसरातील काळूस, पिंपरी, वाकी, रोहकल, रासे, भोसे ,वडगाव घेनंद, पिंपरी, शिवे, करंजविहीरे आणि चाकणच्या वाड्या अशा ३५ शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. यामध्ये वह्या, कंपास, पेन, पाट्या, प्रयत्नरहस्य पुस्तक असे साहित्य वाटप करण्यात आले. मनशक्तीचे समन्वयक प्रा. चिंतामण शिवेकर यांनी ही माहिती दिली. मनशक्तीचे सदस्य बाळासाहेब नाणेकर, काळूराम शिंदे, चंद्रकांत हातुरे, सुनिल बनकर, उज्वला शिवेकर, वंदना भोर, प्रा.अंकुश सावंत, केशव आरगडे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष अंकुश सांडभोर, प्रा.धनंजय भांडवलकर, चेअरमन शिवाजी शिवेकर, सरपंच अक्षय शिवेकर, माजी चेअरमन नामदेव शिवेकर, व्हाईस चेअरमन शंकर सातपुते, गबाजी शिवेकर, हभप. तुकाराम गडदे, नवनाथ शिवेकर, लक्ष्मण शिवेकर, आनंद शिवेकर, पोपट शिवेकर, तुकाराम साकोरे, गोविंद शिवेकर, संदीप कोळेकर, दिलीप करंडे, रामदास शिवेकर, पांडूरंग घेनंद, विक्रम लाड, शिवाजी थिटे, दत्ता लिंभोरे, सत्यवान खेंगले, अश्विनी मोरे, कविता शिवेकर, संदीप शिवेकर, डॉ. अथर्व शिवेकर यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासाठी विश्वस्त प्रमोद शिंदे, प्रल्हाद बापर्डेकर, आदर्श शिक्षक व सर्वाचे प्रेरणास्थान मधूकर संधान, अजित फापाळे, सुनिल बनकर, प्रा.सुभद्रा तापकीर, प्रा.चिंतामण शिवेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्राचार्य धनंजय भांडवलकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शंकर साळूंके यांनी सूत्रसंचालन, तर प्रा.रोहीदास पवळे यांनी आभार मानले.