स्व. अतुल भाऊ भोसले यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
सत्यविचार न्युज :
शंभूशासन प्रतिष्ठाण खेड तालुका संस्थापक अध्यक्ष स्व.पै.अतुलभाऊ भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी मुलांचे वसतिगृह,राजगुरुनगर येथे जेवणाची पंगत, शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले आहे.
स्वर्गीय अतुल भाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. स्वर्गीय अतुल भाऊ भोसले नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांना सामाजिक कार्याचे आवड होती त्यांच्या या संस्कारातून आम्ही छोटासा प्रयत्न करत असल्याचे शंभू शासन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला शंभु शासन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते