कृषिदुतांचे समाजासाठी योगदान प्रशंसनीय – अॕड. सोनल टोपे,
चाकण : प्रतिनिधी
कृषिदुतांचे समाजासाठी योगदान प्रशंसनीय असून त्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे विचार वाकी गावच्या सरपंच ॲड. सोनल टोपे यांनी व्यक्त केले. वाकी बुद्रुक (ता. खेड) येथे ग्रामीण जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पद्मभुषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथे शिक्षण घेणाऱ्या कृषिदूतांचे आगमन झाले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी टोपे बोलत होत्या. यावेळी कृषिदूत योगेश बत्तीसे, तपन शिंदे, माधव शिंदे, अथर्व गव्हाणे, गणेश महाजन, मयंक गवळे, सरपंच अॕड.सोनल विनोद टोपे, ग्रामसेवक एस.एम.आगरकर, मनिषा गारगोटे,दत्तात्रय गारगोटे व ग्रामस्थ उपस्थित होते. हे कृषिदूत पुढील पाच महिने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विविध आधुनिक तंत्रज्ञान, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीकपद्धतींची माहिती देणार आहेत.
तसेच यावेळी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. मोडक, डॉ. प्रशांत घाडगे, पांडुरंग जगताप व डॉ. अविनाश खरे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/06/1000491948-1024x731.jpg)