Kothrud : कोथरूडमध्ये भर रस्त्यात खुनी थरार; पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार..
क्राईम न्यूज ठळक बातम्या पुणे
सत्यविचार न्यूज –
पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनी गुरुवारी ( Kothrud) रात्री खुनाची घटना उघडकीस आली. एका 22 वर्षीय तरुणावर पाठलाग करत कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. डहाणूकर कॉलनी येथील गांधी चौकात आज संपूर्ण प्रकार घडला. सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. श्रीनु शंकर विसलावत (वय 22, लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
खून केल्यानंतर आरोपी सचिन जाधव, बबल्या उर्फ अथर्व शेळके, प्रकाश अनंतकर, यश माने, गौरव माने आणि प्रणव कदम हे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या काहीच असतात यातील सर्व आरोपींना अटक केली. अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी सचिन जाधव आणि मयत तरुणाचे भांडण झाले होते. त्याच रागातून हा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव आणि मयत श्रीनु या दोघांचे महिन्याभरापूर्वी भांडण झाले होते. यावेळी मयत तरुणाने सचिन जाधव याला मारहाण केली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी श्रीनु याचा आरोपीने खून केला. गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास श्रीनु हा फिर्यादी सोबत डहाणूकर कॉलनी परिसरात मित्रासोबत बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी गौरव माने, यश माने आणि प्रणव कदम यांनी दुचाकीवरून येऊन फिर्यादी यांच्या मोपेड स्कूटरला धडक दिली. त्यानंतर आरोपींनी दोघांवरही कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.
दरम्यान कोयत्याचा घाव फिर्यादी यांच्या हातावर लागल्याने फिर्यादी हे घाबरून लक्ष्मी नगरच्या दिशेने पळत गेले. कोयत्याने वार होत असल्याने श्रीनु घाबरून पळत सुटला. त्यावेळी आरोपींनी पाठलाग करून केकवाला दुकानासमोर त्याला गाठले. आणि कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. खून करून आरोपी पसार झाले होते. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी नाकाबंदी करत सर्वच्या सर्व म्हणजे सहाही आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेतले ( Kothrud) होते.