Maval: होणाऱ्या नवरदेवाचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचे कळताच तरुणीची आत्महत्या
होणाऱ्या नवरदेवाचे बाहेर प्रेमसंबंध आहेत. याची (Maval)माहिती मिळताच तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) वराळे मवाळ येथे घडली आहे.
याप्रकरणी पिडितेच्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Maval)आहे. या फिर्यादीवरून विकास राजाराम धामानकर ( वय.30 रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याचे प्रेम प्रकरण असताना ही त्याने पिडितेशी लग्न जमवले कुंकवाचा कार्यक्रम केला. तसेच पीडितेच्या घरच्यांशी फसवणूक केली. याचे मनाला वाईट वाटून घेत तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.