Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | अमोल कोल्हेंनी उडवली आढळरावांची खिल्ली, म्हणाले ”ते रडीचा डाव खेळत आहेत, थ्री इडियट चित्रपटातील…”
सत्यविचार न्यूज :
Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | झोपलेल्याला उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. आढळराव यांनी त्यांच्या डोळ्यांवर विरोधाची कातडी पांघरली असल्याने त्यांना शिरूर लोकसभेतील (Shirur Lok Sabha) विकास दिसत नाही. थ्री इडियट चित्रपटात एक प्रसंग होता. सर्व चांगले म्हणण्यासाठी स्वतःलाच ऑल इज वेल म्हणावे लागायचे. हा त्यातीलच प्रकार आहे, असे म्हणत महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांची खिल्ली उडवली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पत्रकारांशी बोलत होते.(Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil)
अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरीक अडवत आहेत, असा आरोप शिवाजी आढळराव पाटील यांनी केला होता. आढळरावांच्या आरोपाला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले, विरोधक स्वतःचे कार्यकर्ते पेरून ठेवून त्यांनाच प्रश्न विचारायला सांगतात आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media) करतात, असा रडीचा डाव खेळत आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सध्या जोरदार प्रचार मोहिम राबवली आहे.
प्रत्यक्ष गाठीभेटींवर त्यांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे कोल्हे हे विरोधी उमेदवारांवर कोणतीही आक्षेपार्ह टीका
करताना दिसत नाहीत. राजकीय सुसंस्कृतपणा जपणारे उमेदवार, अशी त्यांची प्रतिमा आहे.
मागील काही दिवसांपासून कोल्हे आणि आढळरावांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आज पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.