Chakan : पीएमपी बसची नागरिकाच्या दुचाकीस धडक; एक जण जखमी
पीएमपी बसला थांबवण्याचा प्रयत्न करताना घटना घडली
सत्यविचार न्यूज :
पीएमपी बसला थांबविण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीला पीएमपी बसने(Chakan) धडक दिली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) पहाटे तीन वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे सर्विस रोडवर घडली.
प्रद्युम्न संजय गोरे (वय 24, रा. चाकण) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी चालक प्रवीण दत्तू तांबे (वय 29, रा. चऱ्होली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरे हे त्यांची दुचाकी घेऊन चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर सर्विस रस्त्यावर थांबले होते. पुणे नाशिक रोडवरून येणाऱ्या पीएमपी बसला त्यांनी हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी चालकाने(Chakan) पीएमपी बस भरधाव चालवून गोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. यात गोरे हे जखमी झाले. गोरे यांनी पीएमपी चालक प्रवीण तांबे याला दुचाकी उचलण्यास सांगितले असता तांबे याने गोरे यांना शिवीगाळ केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.