Chakan : खेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष; टँकरची मागणी वाढली
सत्यविचार न्यूज :
खेड तालुक्यात सध्या पुर, वरुडे, जऊळुके बु. कनेरसर या गावांच्या गावठाणासह (Chakan) वाड्यावस्त्यांना तसेच वाडा गावच्या वाड्यांना 5 खाजगी असणाऱ्या शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. आतापर्यत 22 गावांच्या 127 वाड्या वस्त्यांना आणि 17 गावठाणांचे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव दाखल झाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.
खेड पंचायत समितीकडे पुर्व पट्यातील गुळाणी, वाफगाव, वाकळवाडी, चिंचबाईवाडी, पश्चिम भागातील गारगोटवाडी, तळवडे, कोहींडे बु., वाशेरे, नायफड, साबुर्डी, नायफड, टोकावडे, कारकुडी या गावांचे आणि वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव आले असुन बहिरवाडी, कोयाळी तर्फे वाडा, वडगाव पाटोळे ठाकरवाडी, वाकळवाडी, चिचंबाईवाडी या गावांच्या पाणवठ्याची स्थळपहाणी करुन तहसीलदार यांच्या कडे टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे, आपत्कालीन टंचाई विभागाचे प्रमुख आबा भोगावडे यांनी (Chakan) दिली.