आढळराव पाटलांचा अनोखा प्रचार,
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
शिरूर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांच्या प्रचारात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची उणीव वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे भरून काढत आहे. नात्याने मामा भाची असलेल्या या दोघांनी आज एका गावात चक्क महाप्रसाद करण्यात सहभाग घेतला. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त केल्या जाणाऱ्या तिखट गोड पुरी-गुळवणी महाप्रसाद करण्याचा मोह यानिमित्त आढळराव पाटील यांना आवरला नाही. गावात शेकडो महिला पुऱ्या लाटत असताना पूर्वा वळसे यांनी त्यांच्यात बसून पुऱ्या लाटल्या तर शिवाजी आढळराव पाटील यांनी गावकऱ्यांसोबत जंबो कढईत पुऱ्या तळण्याचे काम केले.