आढळराव यांचा मंगळवारी खेड तालुक्यात प्रचारदौरा
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
शिरुर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ खेड तालुका प्रचार दौरा मंगळवार ( दि. २३ ) आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ११ वा. कडधे खंडोबा यात्रा, दुपारी १ वा. देवतोरणे खंडोबा यात्रा, दुपारी ३ वा. निमगाव खंडोबा यात्रा, सायंकाळी ५ वा. खरपुडी खंडोबा यात्रा, सायंकाळी ६ वाजता मेदनकरवाडी खंंडोबा यात्रा, सायंकाळी ७ वा. आळंदी शहर व मरकळ शिव लाॅन्स वडगाव रोड या ठिकाणी कोपरा सभा होणार आहे. प्रचार दौ-यात शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे, भाजप राज्य निमंत्रित सदस्य राम गावडे, कात्रज दुध संघाचे संचालक अरुण चांभारे आदि सहभागी होवून मार्गदर्शन करणार आहेत.