एड. किरण झिंजुरके यांना नोटरी पदाची लॉटरी,.
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष, प्रसिद्ध वकील व हिंदुत्व शौर्य पुरस्कार विजेते एड. किरण दशरथ झिंजुरके यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. खेड तालुका बार असोशिएशनचे सदस्य असलेले एड. झिंजुरके यांना या पदावर काम करण्याची लॉटरी लागल्याने त्यांचे या भागात कौतुक होत आहे. खेड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय असल्याने खेड तालुका बार असोशिएशन मध्ये जवळपास पाचशेहून अधिक वकील कार्यरत आहेत. यापैकी झिंजुरके यांना संधी मिळाली आहे. खेड तालुक्यात दररोज विविध प्रकारचे व्यवहार होत असतात. त्यासाठी नोटरी असलेल्या हुशार वकिलांची मोठी गरज असते. एड. झिंजुरके यांची नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक राजीव दीक्षित, डॉ. पंचाक्षरी पुजारी, एड. किशोर झिंजुरके, ऋषिकेश बुचुडे, शैलेश कड, रविंद्र शिंदे, जयेंद्र नवगिरे, गिरीश कड, संतोष लोणारी, तुळशीराम कुटे, गणेश कड, योगेश साखरे, सत्यवान तांबे, नामदेव पानसरे आदींनी त्यांचे कौतुक केले.