किल्लेदार फिरंगोजी नरसाळा पतसंस्थेचे २२ व्या वर्षात पदार्पण
सत्यविचार न्यूज :
गरजूंना वेळेवर केलेला कर्जपुरवठा, सभासदांना मनमोकळेपणाने वाटप केलेला लाभांश, ठेवीदारांसाठी राबविलेल्या लोकोपयोगी योजना, किल्लेदार पतसंस्थेच्या वतीने दिनदर्शिका वाटप, सर्वांच्या हिताचे लोकोपयोगी व समाजप्रबोधनपर उपक्रम राबवत रौप्यमहोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरु असलेल्या चाकण येथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने बाविसाव्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे.
किल्लेदार फिरंगोजी नरसाळा पतसंस्थेचे संस्थापक – अध्यक्ष एड. किरण झिंजुरके यांनी सांगितले की,” संस्थेच्या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, कर्मचारी वृंद, सभासद, ठेवीदार, कर्जदार, सचिव व हितचिंतक आदींच्या विशेष सहकार्याने संस्था रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. याचे सारे श्रेय माझ्या सर्व सहकाऱ्यांना देत आहे.” यावेळी सेवानिवृत्त शिक्षक राजीव दीक्षित व डॉ. पंचाक्षरी पुजारी यांनी हिंदुत्व शौर्य पुरस्कार विजेते एड. किरण झिंजुरके यांचे कौतुक केले. याप्रसंगी ऋषिकेश बुचुडे, शैलेश कड, रविंद्र शिंदे, जयेंद्र नवगिरे, गिरीश कड, संतोष लोणारी, तुळशीराम कुटे, गणेश कड, योगेश साखरे, सत्यवान तांबे, नामदेव पानसरे आदि उपस्थित होते.