चाकणला प्रभाग २२ मधील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण,.
सत्यविचार न्यूज :
खराब रस्त्याने ये जा करताना नागरिकांना होणारा मनस्ताप वाचविण्यासाठी चाकणच्या माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे यांच्या प्रयत्नातून चाकण नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक २२ मधील श्रीरामनगर येथील दशरथ कॉम्प्लेक्स व कौशल्या कॉम्प्लेक्स मधील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
येथील श्रीरामनगर फेडरेशनचे अध्यक्ष साहेबराव कड यांच्या पाठपुराव्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे.
चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. माजी नगराध्यक्षा पूजा कड यांच्यासमवेत उद्योजक साहेबराव कड, प्रितम लालगुडे, राम कृष्ण चौधरी, तुलसीदास वांगीलवार, प्रकाश सरदार आदींनी या कामाची पाहणी केली. रस्त्यावर डांबर टाकून काम पूर्ण झाल्याने या प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पूजा कड यांचे कौतुक केले आहे.