सत्यविचार न्युज :
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने दावडी (ता. खेड ) येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, खेड तालुका, पुणे व समस्त ग्रामस्थ दावडी यांचेमार्फत रविवार (दि.२४) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. एकूण १५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास श्रीरामचंद्राची प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात आले.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ४० दिवस मरण्यात सहन करून फाल्गुन अमावस्येला प्राणाचे बलिदान दिले. संभाजी राजांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून या कालावधीत बलिदान मास पाळण्यात येतो. बलिदान मासानिमित्त दावडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चाकण ब्लड बँकेचे डॉ. भरत चौधरी, डॉ.आकाश जगताप, स्वप्निलशेठ गव्हाणे, सुरज गव्हाणे, उत्तम गायकवाड, समीर रायकर, वैभव मांजरे, सोमनाथ म्हसाडे, संदेश जाधव, प्रतिक जाधव, सुमित जाधव , अक्षय जाधव, शेखर जाधव, अक्षय म्हसाडे, सोमनाथ जाधव, अतुल दिघे, नागेश दिघे, प्रतिक दिघे, आशिष गायकवाड, अजय दिघे, प्रदिप गाडगे, सतिश जाधव, दिपक गव्हाणे, मंगेश गव्हाणे, वैभव म्हसाडे, गणेश दिघे, गणेश कान्हुरकर, युवराज बोत्रे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठीपरिश्रम घेतले.