LokSabha Elections 2024 : काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी
सत्यविचार न्यूज – काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ( LokSabha Elections 2024 ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी
- नंदुरबार- गोवाल पाडवी
- अमरावती- बळवंत वानखेडे
- नांदेड- वसंतराव चव्हाण
- पुणे- रवींद्र धंगेकर
- लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे
- सोलापूर- प्रणिती शिंदे
- कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती