अॅ ड नवनाथ भुजबळ यांना नोटरी पदाची लॉटरी
अॅ ड
सत्यविचार न्युज :
चाकण येथील प्रख्यात वकील अॅ ड नवनाथ दत्तू भुजबळ यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. खेड तालुका बार असोशिएशनचे सदस्य असलेले एड. भुजबळ यांना या पदावर काम करण्याची लॉटरी लागल्याने त्यांचे या भागात कौतुक होत आहे.
खेड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय असल्याने खेड तालुका बार असोशिशएशनमध्ये जवळपास पाचशेहून अधिक वकील कार्यरत आहेत.
यापैकी भुजबळ यांना संधी मिळाली आहे. खेड तालुक्यात दररोज विविध प्रकारचे व्यवहार होत असतात. त्यासाठी नोटरी असलेल्या हुशार वकिलांची मोठी गरज असते. अॅ ड. भुजबळ यांची नोटरीपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.