आईच्या अस्थींचे विसर्जन न करता केली वृक्ष लागवड
सत्यविचार न्युज :
कोरोना काळात रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा सर्वांना ज्ञात असून त्यामुळे निसर्गातून फुकट मिळणार्या ऑक्सिजनचे महत्त्व अनेकांना लक्षात आले आहे. यामुळेच खेड तालुक्यातील महाळुंगे येथील अलकाबाई संभाजी वाळके (वय ६७ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूपश्चात आपल्या आईची स्मृती कायमस्वरूपी जिवंत राहाव्यात, म्हणून कुटुंबातील सदस्यांनी आईच्या अस्थी व राख पाण्यात विसर्जन न करता शेतात खड्डा खोदून त्यात अस्थी विसर्जन करत वृक्ष लागवड केली.
आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवण सदैव अबाधित राहावी, त्यातून गावासमोर एक आदर्श निर्माण व्हावा
परिसरात औद्योगिकीकरण वाढले आहे प्रदूषणामुळे हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होत चालले आहे
झाडांमधून मोठ्या प्रमाणात मोफत ऑक्सिजन मिळत आहे. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या ध्येयातून या वाळके कुटुंबाने आईच्या अस्थींचे विसर्जन न करता त्यात वृक्ष (चंदन)लागवड केली. अलकाबाई वाळके यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
निधनानंतर प्रथेप्रमाणे अस्थींचे विसर्जन हे वाहत्या पाण्यात नदीत केले जाते. असे असले तरी त्यांच्या कुटुंबियांनी आईच्या अस्थींचे विसर्जन न करता शेतात खड्डा खणून अस्थी ठेवून वृक्ष (चंदन) लागवड केली आहे. त्यामुळे वृक्षरूपाने आईच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा एक आदर्श आमले कुटुंबाने समाजापुढे ठेवला आहे. दिवंगत वाळके यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी दीर,भावजय, पुतणे, सुना, नातवंडे असा एकत्रित परिवार आहे. अलकाबाई वाळके यांच्या निधनानंतर त्याच्या मुलांनी वृक्ष लागवडीचा व त्याला आपल्या आईच्या आठवणी जोडण्याच्या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत दादा इंगवले, माजी चेअरमन राजेंद्र बापू इंगळे इनामदार, काशिनाथ गायकवाड, दिलीप दगडू वाळके, सुनील फलके, केरभाऊ सावंत, अशोक शिवळे, अनंता वाळके, दत्तात्रय वाळके, देविदास वाळके, अनिल वाळके, रोहित वाळके आदी मान्यवर पाहुणे मंडळी उपस्थित होते.