Chinchwad : सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
सत्यविचार न्युज :
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Chinchwad) तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. 14) दिले आहेत.
सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्याकडे पिंपरी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भोसरी एमआयडीसी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्याकडे असणार आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. यापूर्वी सहायक आयुक्त माने यांच्याकडे विशेष शाखेचा अतिरिक्त कार्यभार होता.
तर वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्याकडे गुन्हे (Chinchwad) शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून आयुक्तालयात बदल्यांचे सत्र सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी केली जात आहे.