बिबवेवाडीमध्ये गॅरेजला आग; बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हरसह १७ चारचाकी वाहने जळून खाक
सत्यविचार न्युज :
बिबवेवाडी, आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात आज (दि.१५) पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाकडून दोन बंब रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले, सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागली असून जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री करत चारही बाजूने पाण्याचा मारा केला. सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पुर्ण विझवली.
या आगीमध्ये गॅरेजमधील एकुण १७ चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240315-WA0023-1-1024x870.jpg)