कमलबाई वडगांवकर ( कर्नावट ) यांचे निधन
सत्यविचार न्युज :
आळंदी येथील जेष्ठ नागरिक नेत्रदात्या कमलबाई रमेश वडगांवकर कर्नावट ( वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक, शांत स्वभावी, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणाऱ्या, कुटुंबा बरोबरच समाजहित जपणाऱ्या होत्या. त्या रमेश धनराज वडगांवकर (कर्नावट) यांच्या धर्मपत्नी व उद्योगपती संजय वडगावकर यांच्या मातोश्री असून खेड तालुक्याचे स्व. आमदार ताराचंद हिराचंद वडगांवकर यांच्या सुनबाई , माजी नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर यांचे भावजय, माजी नगराध्यक्षा शारदा वडगांवकर यांच्या जाऊबाई होत. कमलबाई वडगांवकर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी आपली दृष्टी दान करून नेत्रदान चालवली ला प्रेरणा दिली आहे.
त्यांच्या पाठी मागे त्यांचे पती रमेश वडगांवकर, मुलगा उद्योगपती संजय वडगांवकर, सुनबाई ललिता, मुली रंजना शिंगवी, वंदना शिंगवी, नातू साहिल, नात स्नेहल असा परिवार आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240312-WA0043-1-716x1024.jpg)