गुणवंत महिलांचा शिवसेने तर्फे आळंदीत सन्मान
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240312-WA0040-1024x461.jpg)
सत्यविचार न्युज :आळंदी येथील शिवसेना महिला आघाडी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), राजमाता महिला प्रतिष्ठान आळंदी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रभावी गुणवंत महिलांचा सन्मान करण्यात आला. नूतन पदाधिकारी यांचा सत्कार साडी, श्रीफळ देऊन वैशाली बाबाजी काळे, जिल्हा संघटक सुलभा उबाळे, शिरूर लोकसभा उप संघटक अनिता झुजम यांचे हस्ते उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधीकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.
या प्रसंगी आंबेगाव तालुका उप संघटक सुरेखाताई निघोट, शिरूर लोकसभा उपसंघटक अनिता झुजम, विभाग प्रमुख आशा भालेराव, उप ता. संघटक मंगला सोनवणे, खेड ता. संघटक उर्मिला सांडभोर, उप तालुका प्रमुख किशोरी बर्गे, खेड उपतालुका प्रमुख सारिका मेदगे, विभाग प्रमुख शुभांगी यादव, विभाग प्रमुख भारती वाघमारे, उपविभाग प्रमुख सन्याली ठाकूर, आळंदी शहर प्रमुख अनिता शिंदे, नीलम कुरधोंडकर, कांता शिरसाट, शाखा प्रमुख उषा ननवरे, शाखा प्रमुख शालन होनावळे, उपशहर प्रमुख उषा नेटके, शाखा प्रमुख कांता शिरसाठ, शाखा प्रमुख ताई शेवते, शाखा प्रमुख लता वर्तुळे, शाखा प्रमुख संगीता मेटे, शाखा संघटक कल्याणी भालप, उषा ननवरे, ईश्वरी शिर्के, शैला तापकीर, लीला थोरवे, त्रिवेणी उबाळे आदी उपस्थित होते.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240312-WA0042-576x1024.jpg)