चाकण (प्रतिनिधी)
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी (दि. १८ मार्च २०२३ रोजी ) कांद्याची २० हजार ५०० पिशवी आवक होऊन कांद्याला ८०० ते १२०० रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. बटाट्याची ३५०० पिशवी आवक होऊन बटाट्याला ८०० ते १४०० रुपये दर मिळाला; नवीन गावरान बटाट्याला ८०० ते ११०० रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.
——-
कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी हा चिंतेमध्ये गेला होता. कांदा उत्पादकांना थोडीफार मदत करण्याचे हेतूने राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.