पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत सराईताला पिस्टल व गांजासह अटक केले आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
मयूर अनिल घोलप (वय 29, रा. चिंचवडगाव) व त्याचा साथीदार शंभू संजय गंगावणे (वय 21) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणीविरोधी पथके (शनिवारी दि.18) हिंजवडी, मारुंजी, कासारसाई भागात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील मयूर घोलप हा पुसाने गावाकडे येत असून त्याच्याकडे शस्त्र आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱ्या मयूर व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांचे पिस्टल, 65 हजार रुपयांची दुचाकी, 31 हजार रुपयांचा 1240 ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण एक लाख छत्तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून आरोपीवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर अपहरण खुणाचा प्रयत्न, खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, असे सात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडा आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, अशोक दुधावणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, आशिष बोडके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गट्टे यांनी केली.
