खालूंब्रे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
सत्यविचार न्युज :
खालूंब्रे (ता. खेड ) येथे महाशिवरात्रीनिमित्त शनिवार पासून (ता. २) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन, श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन, नेमाचे भजन, हरिपाठ, सायंकाळी सात ते नऊ या वेळेत संतोष महाराज काळोखे, ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, काजल ताई काळे (पोतले), महेश महाराज मडके, गौतम महाराज बेळगावकर, मुक्ता ताई सोनवणे, प्रदीप महाराज नलावडे यांची कीर्तन सेवा होणार आहे. व पांडुरंग महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन गावातील विविध संस्था व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.