Gaganyaan Mission : गगनयान मोहीमेसाठी पाठवल्या जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे घोषीत
सत्यविचार न्यूज – अंतराळात माणसाला पाठवण्यासाठी ( Gaganyaan Mission ) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गगनयान मोहीमेची जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकतंच इस्त्रोने यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे घोषीत केली आहेत.केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली.
प्रशांत बालकृष्णन नायर (ग्रुप कॅप्टन), अंगद प्रताप (ग्रुप कॅप्टन), अजित कृष्णन (ग्रुप कॅप्टन) आणि शुभांशु शुक्ला ( विंग कमांडर ) यांची भारताच्या अंतराळातील पहिल्या क्रू मिशनवर अंतराळवीर म्हणून निवड झाली आहे. ते सर्व भारतीय हवाई दलामध्ये एकतर विंग कमांडर किंवा ग्रुप कॅप्टन आहेत आणि त्यांना चाचणी वैमानिक म्हणून काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. याचा अर्थ ते आधीच प्रशिक्षित आहेत की काहीतरी चूक झाल्यास त्वरीत प्रतिसाद देण्यास तयार आहे.
चार अंतराळवीर बेंगळुरू येथील अंतराळ संस्थेच्या अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेत प्रशिक्षण घेत आहेत. अंतराळवीरांची निवड आयएफ च्या एरोस्पेस मेडिसिन संस्था येथे झाली.गगनयान मिशन भारतासाठी मैलाचा दगड ठरु शकणार आहे. भारताने जर हे मिशन यशस्वी केले तर अंतराळात व्यक्तीला पाठवणारा भारत चौथा देश (Gaganyaan Mission ) ठरेल.