वाढदिवस साजरा केला अनाथ बालकांना सुखाचा घास देऊन
सत्यविचार न्युज :
भोसरी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाने स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांना गोड जेवण देऊन साजरा केला.
नितीन जायभाये ह्या भोसरी येथील युवकाने २७ व्या जन्मदिनी श्री अन्नपूर्णा नगर, आळंदी येथील श्री अन्नपूर्णा माता आश्रम येथील ७० किशोरवयीन मुलाबरोबर २७ वा वाढदिवस साजरा केला.
या मुलांना गोड जेवणाचा आस्वाद दिला.
नितीन जायभाये म्हणाला की, मोठं मोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे आशिर्वाद मिळतील.
नितीन जायभाये हे एका खाजगी कंपनीत काम करत आहे त्यांचे अनेक बडे नेत्यांची जवळीक आहे परंतु कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहे.
आश्रमाचे संचालक महंत श्री स्वामी गणेशानंद महाराज म्हणाले, मी गेली अनेक वर्षे अनाथांचा सांभाळ करताना काही मोजकेच तरुण इथे येऊन भोजनसेवा देत असतात. कारण हा आश्रम तुमचा माझा सर्वांचा आहे, येथील मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो.
कार्यक्रमाला प्रा.डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, मनीषा पांडुरंग मिसाळ, कु.भक्ती पांडुरंग मिसाळ, सचिन भाऊ फडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी नितीन यांचा मित्र परिवार प्रा. अर्जुन बारगजे सर, आव्हाड सर, बळीराम वाघमारे, शंकर बोराडे, निलेश नागरगोजे, शिवाजी सानप, विकास केकान हे उपस्थित होते.
नितीन जायभाये यांच्या या कार्याचे अनेक स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबर कौतुकाचा वर्षाव होत आहे.